spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 — प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदे गटाची दणदणीत एन्ट्री

तुळजापूर प्रतिनिधी:

तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असलेल्या 17 नोव्हेंबर रोजी दिवसभर प्रचंड लगबग, गर्दी आणि राजकीय हालचालींना वेग आला होता. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगरसेवक पदाची उमेदवारी सुनिता प्रभाकर पाटील यांनी मोठा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केली.

सुनिता पाटील या शांत स्वभाव, सामाजिक कामात सक्रियता आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ असणाऱ्या उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे चिरंजीव गणेश पाटील हे सामाजिक-राजकीय क्षेत्रात आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे युवा नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना यामध्ये त्यांची सक्रिय भूमिका असून ते शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे तालुकाध्यक्षही आहेत. अन्यायाविरुद्ध भूमिका, प्रश्नांना वाचा फोडणे आणि कार्यकर्त्यांना योग्य दिशा दाखविणे या त्यांच्या कामगिरीमुळे प्रभागात विशेष चर्चेला उधाण आले आहे.

याच बळावर सुनिता पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून अर्ज भरताना गणेश पाटील व त्यांच्या पत्नी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी फौज उपस्थित होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळगे आणि नगरपरिषद मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या समक्ष हा अर्ज सादर करण्यात आला.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये या उमेदवारीमुळे निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार झाली आहे. तुळजापूरचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून इथे नेमकी कोणाविरुद्ध कोण अशी लढत आकार घेते हे अर्ज छाननीनंतर स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे मैदानात उतरले असून मतदारांनी स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना पसंती दिली तर प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकूणच, सुनिता पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये चुरशीची लढत होणार आणि तुळजापूरच्या निवडणूक रंगतिला अजून धार येणार हे निश्चित झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या