spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १० मधून सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका योगेश सुरवसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नळदुर्ग | प्रतिनिधी .दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १० मधून समाजातील वंचित घटकांसाठी सतत कार्यरत असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीच्या निष्ठावंत कार्यकर्त्या प्रियंका योगेश सुरवसे यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्या अनुसूचित जाती महिला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरत असून, त्यांच्या मागे विचारवंतांचे विचार, सर्वसमावेशक विकासाची तळमळ आणि सामाजिक न्यायाचे भक्कम आधारस्तंभ आहेत. प्रियंका सुरवसे यांचे पती योगेश सुरवसे हे दलित पँथरचे कट्टर समर्थक असून, भिम चळवळ आणि धम्म प्रचारात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड आणि नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या वेळी उमेदवार प्रियंका सुरवसे यांच्यासह रमेश पिस्के, योगेश सुरवसे, मधुसुदन दुरुगकर, विनय सोनवणे, संजय काटवटे आणि शिवाजी कनकधर हे उपस्थित होते.

प्रियंका सुरवसे यांनी सांगितले की, “मी समाजातील वंचित, पीडित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीला उभी आहे. माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक ऐक्याच्या दिशेने मी प्रयत्नशील राहीन.”

Related Articles

ताज्या बातम्या