नळदुर्ग (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फुलवाडी शिवारातील पोगल सुतमिल इमारतीजवळ शंकरराव बोरकर यांच्या पडीक शेतजमिनीत एक अनोळखी पुरुष जातीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात आ. प्र. क्र. 60/2025, कलम 194 BNSS अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे—
अंदाजे वय : 35 ते 40 वर्षे
उंची : अंदाजे 5 फूट 4 इंच
वर्ण : निमसावळा
बांधा : मध्यम
अवस्थाः मृतदेह अर्धवट जळालेला
वेषभूषा : कंबरेला बहुरंगी (Multi Colour) करदोडा, अंगात ESSA TRENZ कंपनीची चॉकलेटी रंगाची अर्धवट जळालेली अंडरविअर
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख पटलेली नसून परिसरात घटनेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा मृतदेह आपल्या ओळखीचा असल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ नळदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी :
पोलीस स्टेशन नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
पोलीस निरीक्षक श्री. सचिन यादव – मो. 9049234303
पोलीस स्टेशन – फोन : 02471-246033, मो. 9607998717
नळदुर्ग पोलिसांनी नागरिकांना सहकार्याची विनंती केली असून कोणतीही उपयुक्त माहिती मिळाल्यास तपासाला गती मिळणार असल्याचे सांगितले आहे.






