प्रभाग १० मधील उमेदवारांची बहुरंगी लढत होणार
———————————————-
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग १० मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या महिला अपक्ष उमेदवार म्हणून फुले शाहू आंबेडकर चळवळीतल्या निष्ठावंत कार्यकर्त्या नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक दादाराव बनसोडे यांच्या पत्नी महादेवी अशोक बनसोडे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज काढून घेण्याचा दिवस असल्याने सदरील अर्ज कायम ठेवल्याने उमेदवार महादेवी अशोक बनसोडे यांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे .प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून या प्रचाराला सुरुवात करण्यात आली
जनतेचा विश्वास जिंकत जनतेच्या मनातील सर्वे कामे निर्मळ व निर्भीडपणे करण्याचा निर्वाळा त्यांनी दिला . ही निवडणूक प्रभाग १० मधील बहुरंगी होत असल्याचे दिसून आल्याने नळदुर्ग शहरात चर्चेचा विषय बनला आहे
वास्तविक पाहता नळदुर्ग शहरातील दलित वस्तीतील चळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत धम्म चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आसतात त्यांनी नुकताच नळदुर्ग येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची रणधुमाळी सुरू झाली आसुन ही निवडणूक अटी तटी ची होणार आसल्याने आता पाहावयाचे आहे जनतेचे मने जिंकण्यासाठी जनतेचा विकास करण्यासाठी तातडीने प्रचाराचा वेग कोण घेणार उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रचारा संदर्भात प्रत्येक उमेदवार नगर सेवक बनण्यासाठी उत्सुक बनला आहे प्रत्येकाच्या घर भेटी घेत आहेत आता पहावे लागणार आहे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार






