चोरीचा केला बेबनाव
गुन्हा अन्वेषण विभागाने ४८ तासात घेतले आरोपीला ताब्यात
*जळकोट :– ( अरुण लोखंडे )*
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे दिनांक २१ नोव्हेंबर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर मध्ये घरी एकटीच राहत असलेल्या कै.सुभद्राबाई रामशेट्टी पाटील वय 65 वर्ष यांचा त्याच्याच शेजारी राहाणारी वनिता झुंबर सुरवसे या महिलेने नाक तोंड दाबून खून करून घरातील सोनं घेवून रात्री ३ .१० मी आरोपी महिला पसार झाल्याची घटना घडली आणि जळकोट मध्ये एकच खळबळ उडाली
याबाबत पोलीस सुत्राकडून थोडक्यात मिळालेली माहिती अशी की वृद्ध महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या महिला वनिता झुंबर सुरवसे आणि मयत सुभद्रा रामशेट्टी पाटील यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीचा व्यवहार होता . आणि त्या दोघीमध्ये पैसे देण्याच्या कारणावरून शाब्दीक खटके उडत होते . २१ नोव्हबर च्या रात्री आरोपी यांनी मयत सुभद्रा यांच्या घरात प्रवेश केला व सुभद्रा यानी आरोपी वनिता यांना पैश्याची मागणी केली पैश्याची मागणी केल्यानंतर त्या दोघीमध्ये शाब्दीक चकमक झाली आरोपी महीला वनिता सुरवसे यांनी घराचा दरवाजा आतून लावून घेताला व सुभ्रद्राबाई याच्याशी झोबाझोबी करून ज्या काटवर सुभ्रदा बाई बसल्या होत्या त्याच काटवर आरोपी महिला यांनी त्यांना खाली पाडून त्याला नाक तोड दाबल्याने श्वास गुदमरून त्या जागीच मरण पावल्या त्या नंतर आरोपी यांनी त्याच रात्री जळकोट मधून पळ काढली सकाळी सात वाजता जेव्हा ही घटना निर्दशनास आली तेव्हा जळकोट गावात एकच खळबळ उडाली बघता बघता मयत सुभ्रद्राबाई रामशेट्टी पाटील यांच्या घरासमोर बघ्याची गर्दी जमली चोरांनी चोरी करून महिलाचा खून केला म्हणून गावात हळहळ वक्त करु लागले सदर घटनेची माहिती नळदुर्ग पोलीस ठाण्यास कळवली असता तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलीस पण घटनाक्रम पाहून चक्रावून गेले दरोडा की , घातपात पोलीसांनी सर्व बाजूंनी घरातील अस्त व्यस्त पडलेल्या सामानाचा फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने कसुन चौकाशी केली ठसे तज्ञानी घरातील कपडे व मयताच्या अंगावरील ठसे घेवून चौकाशी केली पण त्यातही काही निप्पन्न झाले नाही . पण गावातीलच एक महिला रात्रीपासून गावातून गायब आहे की , जिचे मयता सोबत आर्थिक व्यवहार आणि बैठक होती हे पोलीसाना माहिती मिळाली आणि सी सी टीव्ही फुटेज ही प्राप्त झाल्याने पोलीसांनी तपासांची चक्रे त्या दिशेनी चालू केली आरोपी महिलेचे लोकेशन भिगवण येथे दाखवत होते त्या लोकेशन द्वारे सदर आरोपी महिला वनिता झुंबर सुरवसे ही भिगवण येथे
मुलीच्या सासरच्या घरी होती तिला गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमेने दि २३ नोव्हबर रोजी ताब्यात घेवून धाराशिव येथे आणले नंतर तिची कसून चौकाशी केली असता आपणच हा हात्याकांड केले आहे अशी कुबली दिल्याचे पोलीस सुत्राने सांगितले आहे प्रथम मयताचे नातू .राहूल रामशेटी पाटील यांच्या फिर्यादी वरून आज्ञात ईसमा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता पण आरोपी मिळताच आरोपी विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात कलम १०३ ( १) ३३१ ( ८ ) ३०५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून एक आरोपी मिळाला आहे अनखी यामध्ये किती आरोपी आहेत याचा तपास पोलीस करित आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक सचीन यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोळूंखे साहेब संपोनि आनंद कागुणे पोलीस उपनिरिक्षक ईश्वर नांगरे पाटील गिते साहेब बिट आमलदार पदम गायकवाड धनराज कुंभार साहेब आदी करित असून . ४८ तासात आरोपीच्या मुसक्या ओवळण्यात यश आल्याने गुन्हा अन्वेषण विभागाच्या टिमचे आणि नळदुर्ग पोलीसांचे सर्व स्थतरातून अभिनंदन होत . या गुन्हेगार महिलेवर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी जळकोट येथील नागरिकांतुन होत आहे .






