spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १० मधील अपक्ष उमेदवार अजयकुमार बागडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला .

काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते पक्षाने उमेदवारी डावलली म्हणून बंडखोरी 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे

फुले शाहू आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत वडिलो पार्जित कार्यकर्ते अजयकुमार सदाशिवराव बागडे हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहून राष्ट्रीय काँग्रेस पक्षांची निष्ठा जपली काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेची नाळ जोडली आणि याच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी चक्क त्यांचे तिकीटच कापली 

खरेतर नळदुर्ग शहरातील जबाबदारी काँग्रेस पक्षाची मोजक्याच कार्यकर्त्यांवर होती परंतू काय झाले अचानक पणे त्यांना नाकारली आहे म्हणून प्रभाग क्रमांक १० सर्व साधारण पुरुष नगरसेवक पदासाठी बंदखोर उमेदवारी दाखल केली आहे .

फुले शाहू आंबेडकर चळवळीला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजामध्ये गणना आहे वडिलोपार्जित ज्याने समाजसेवा केले या समाजसेवेचा ठसा प्रत्येक समाजातल्या जन मानसा पर्यंत पोहोचवलेला आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडता या देशाला देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी आहेत बंडखोर उमेदवार अजयकुमार सदाशिवराव बागडे यांनी नळदुर्ग शहरांमध्ये सिव्हिल अभियंता म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम पाहतात अनेक कामे त्यांच्या हातून झालेली आहेत शिवाय रमाई घरकुल आवास योजनेची कामे झालेली असून ते सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत केवळ समाजसेवा पूर्ण न करता त्यांनी समाजातल्या गरजू व्यक्तींना त्यांच्या उपयोगी वस्तूचे वाटप करणे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंची वाटप करणे प्रत्येकांच्या सुख आणि दुःखामध्ये सहभागी होऊन त्या लोकांना नागरिकांना प्रोत्साहन देणे इतर नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हा त्यांचा ध्यास असतो खरंतर नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ यासाठी नगरसेवक पदासाठी छत्रपती शिवराय फुले शाहु आंबेडकर विचारांची निस्वार्थ पणाची खान आहे या साठी जनता मतदार खुप हुषार आहेत

महापुरुषांचे विचार घेऊन मी प्रभाग १० मधून सर्वसाधारण पुरुष नगरसेवक पदासाठी खंबीरपणे उभा आहे यासाठी आपण आपले अनमोल ” मत दान ” मला देऊन जनसेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती वृत्तपत्राशी बोलताना अजयकुमार बागडे यांनी व्यक्त केले

Related Articles

ताज्या बातम्या