spot_img
spot_img
spot_img

जि.प. प्राथमिक शाळा वागदरी येथे संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा

वागदरी ( एस.के. गायकवाड ):

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे दि.२६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला असून या निमित्ताने या शाळेतून बदली होऊन अन्य ठिकाणी सेवेत रुजू झालेल्या सहशिक्षिका रेखा साखरे मॅडम व याच शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका महादेवी जत्ते मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांना आणि शालेय विद्यार्थ्यांना या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते एस. के. गायकवाड यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.

भारतीय संविधान दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिना निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे विद्यमान सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपसरपंच मीनाक्षीताई बिराजदार,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एस.के.गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कोमल झेंडारे,बचत गटाच्या सीआरपी विद्या बिराजदार,आदी उपस्थित होते.

प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर २६ नोव्हेंबर २०११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या निमित्ताने सामुदायिकरित्या संविधानाच्या उद्देशिका चे वाचन करून सह शिक्षिका रेखा साखरे मॅडम व सेवा निवृत्त मुख्याध्यापिक महादेवी जत्ते यांचा समस्त ग्रामस्थांच्या व शाळेच्या वतीने यथोचित सात्कार करण्यात आला.

या प्रसंगी एस.के. गायकवाड, महादेवी जत्ते,सहशिक्षिका रेखा साखरे, शाळेचे मुख्याध्यापक बि.बि. सगर व शालेय विद्यार्थी यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सहशिशिका एस.एस.मसे मॅडम यानी केले तर अभारप्रदर्शन सहशिक्षक डी.बी.अनपट यानी कोले.

यावेळी सहशिक्षक एन.एन.काळे, टी.एम. लोहार, शिक्षण प्रेमी पालक शीतल झेंडार, जिजाबाई लकडे, अंगणवाडीच्या पद्मिनीबाई पवार, रूपाली जाधव,अशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार, पारुबाई शेख सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या