spot_img
spot_img
spot_img

जनतेची सेवा करण्याची इच्छाशक्ती असलेले आपल्या हक्काचे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा : सुजात आंबेडकर

जिल्हा प्रतिनिधी(शाम नागिले):

आतापर्यंत आपण निवडून दिलेले आमदार,खासदार नगरसेवक,अध्यक्ष यांना जनतेची विकास कामे करण्याची इच्छाशक्तीच नसल्यामुळे धरण उशाला असून देखील पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळण्याची वेळ आपल्यावर आली त्यांनी जनतेची कामे करण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधून केवळ भावनिक करून जाती-जातीमध्ये हिंदू मुस्लिमा मध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली याचा विचार करून जनतेची सेवा करण्याची इच्छाशक्ती असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला विजय करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नळदुर्ग येथे बोलताना केले.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून सखाराम नारायण गायकवाड प्रभाग क्रमांक आठ मधून ओंकार कलशेट्टी तर प्रभाग दहा मधून सचिन राठोड हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असून दिनांक २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे अवचित साधून त्यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग येथील भीम नगर मध्ये सुजात आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.याप्रसंगी ते सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की नळदुर्ग हे शहर ऐतिहासिक किल्ल्यामुळे पर्यटन स्थळाचा दर्जा लाभलेले शहर आहे या ठिकाणी अनेक विकास कामे, अनेक शासनाच्या योजन राबविण्याची संधी असून पर्यटनाच्या दृष्टीने व्यापक विकास केला तर येथील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो,येथील जनतेला दररोज पाणी मिळण्याची व्यवस्था ही होऊ शकते परंतु येथील प्रतिनिधीला काम करण्याची इच्छाशक्ती असावी लागते त्यासाठी आपले हक्काचे प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे.

या सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष गोविंद भंडारी यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रिय कार्यकारणी सदस्य डॉ.नितीन ढेपे, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल,धाराशिव जिल्हा अध्यक्ष अँड.प्रवीण डिकले, जिल्हा उपाध्यक्ष आर.एस.गायकवाड,जिल्हा संघटक विकास बनसोडे, परमेश्वर लोखंडे ,उमरगा तालुका अध्यक्ष रामभाऊ गायकवाड ,नळदुर्ग शहराध्यक्ष श्यामसुंदर भैया लोखंडे सह कार्यकर्ते,नागरीक, महिला युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या