spot_img
spot_img
spot_img

माजी समाज कल्याण सभापती जनार्धन वाघमारे याचे निधन

जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते धाराशिव जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती जनार्धन वाघमारे (बापू ) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे

सलगरा (मड्डी )येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या जनार्धन वाघमारे (बापू ) अल्पशिक्षीत होते पण मात्र शिक्षण घेतलेल्या तरुणाना सुद्धा लाजवेल असे कार्य बापू यांनी केले होते समाज कल्याण सभापती असताना जिल्यातील सर्व गोर गरीब जनतेला ज्या काही समाज कल्याण मार्फत योजना मिळत होत्या त्या प्रामाणिक पणे देण्याचे कार्य बापू यांनी केले होते वाघमारे बापू हे राजकारणातील एक निस्कलक चेहरा आणि पार्दशक नेता म्हणुन त्यांची ख्याती होती . आणि एक जन सामान्याचा नेता म्हणुन या परिसरात बापू याच्याकडे पाहीले जात होते त्यांनी नेहमीच आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते याना नेहमीच बळ देण्याचे कार्य बापू यानी केले आहे बापू याच्या जाण्याने या परिसरात शोककळा पसरली आहे .

त्याच्या पश्चात तीन मुले पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे त्याच्यावर उदया शुक्रवार दि . ५ डिसेंबर रोजी सलगरा येथील निर्वाण भुमीत त्याच्यावर अंतिम संस्कार होणार आहे .

Related Articles

ताज्या बातम्या