जळकोट ( अरुण लोखंडे ):
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथिल भिमनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीतून बारीक मुंग्या मिश्रीत पाणी आल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने ग्रा.प.च्या गलथन कारभारा बदल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या बाबत माहीती असी की जळकोट येथिल भिमनगर मधिल जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी इंधन विहीरीतून पाईप लाईन करून मुख्य चौकातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येत असून पाण्याचा टाकीतील जमा झालेले पाणी भिमनगर मथिल प्रत्येक कुटूबाला नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.दि.५ डिसेंबर २o२५रोजी सकाळी ठिक ११.४० वा.दरम्यान नळाचे पाणी भरण्यासाठी येथील नागरीक. पाणी भरण्यासाठी गेले असता त्यात चक्क बारीक मुंग्या मिश्रीत पाणी आले. पाण्यानी भरलेले बकेट मध्ये पाण्यावर बारीक मुंग्याचा थर जमा झाला. हे पाहून उपस्थित ग्रामस्थानी ग्रा.प.च्या गलथन कारभारा बद्दल संताप व्यक्त केला. एक तर सहा सहा महिने पाण्याची टाकी धुतली जात नाही पाण्यात जंतू नाशक पावडर टाकले जात नाही. त्यान दुष्काळात तेरावा महिना म्हणटल्या प्रमाणे चक्क मुंग्या मिश्रीत पाणी मिळाल्याने येथील मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यात जनतेच्या हातापाया पडून खोटे भुलथापा मारून निवडून आलेले या प्रभागाचे लोकप्रतिनिधी (सदस्य ) कधीही भीमनगर कडे कधीही फिरकत नाहीत निवडून आल्यानंतर त्यांना विसर पडला आहे की, काय असा सवाल येथील जनतेला पडला आहे . मग येथील मुलभूत गरजा आम्ही विचारायाच्या कोणाला . ? या बाबीकडे वेळीच याकडे लक्ष देवून पिण्याच्या पाण्याची टाकी वेळच्या वेळी धुवून जंतू नाशक पावडर टाकून घ्यावे येथील नागरीकांच्या आरोग्यास काही इजा झाल्यास ग्रामपंचायतचे सरपंच व या भागाचे लोकप्रतिनिधींना याना दोषी धरण्यात येईल असा इशारा येथील नागरीकांतून बोलले जात आहे . या संदर्भात ग्रामपंचायत यानी गांभीर्यपूर्वक विचार करून सदरील पाण्याची टाकी किमान महिन्यातून दोनवेळा तरी धुवून घेवून त्यामध्ये जंतूनाशक पावडर टाकून वेळेत घ्यावे असे नागरीकांचे वातीने अवहान करण्यात येत आहे अन्यथा पुढच्या काळात ग्रा.प. कार्यालयादर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात येईल असा शब्दात ग्रामस्थातून संताप व्यक्त केला जात आहे.






