धारूर (धाराशिव तालुका) – प्रतिनिधी
धारूर येथील सिद्धार्थ नगर (दलित वस्ती) येथे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर झालेल्या सिमेंट रस्ता व नाली कामास जाणूनबुजून सुवर्ण वस्तीत वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निषेधार्थ ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे काम तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.
मंजूर काम दलित वस्तीत… तरीही दुसरीकडे वळविण्याचा आरोप
सिद्धार्थ नगरातील नवबौद्ध (दलित) वस्तीसाठी सांकेतिक क्र. ३८५ अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामास शासनमान्यता मिळाली होती. मात्र हे काम मूळ स्थळावरून हटवून सुवर्ण वस्तीत सुरू करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. हा प्रकार दलित समाजाच्या हक्कांवर अन्याय असून योजनाबद्ध पद्धतीने नुकसान करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन — जबाबदारांवर कारवाईची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, मंजूर काम दुसऱ्या वस्तीत वळविणे हे एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन ठरते. त्यामुळे संबंधित अधिकारी किंवा व्यक्तींवर योग्य ती कारवाई करून सुवर्ण वस्तीत सुरू झालेल्या कामाला त्वरित स्थगिती द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) तर्फे निवेदन
ग्रामस्थांची भूमिका अधोरेखित करणारे हे निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या लेटरहेडवर देण्यात आले असून यावर खालील स्वाक्षऱ्या आहेत:
राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष, धाराशिव
सौ. कांचन गायकवाड, सदस्य, ग्रामपंचायत धारूर
सुरेश रोकडे
बापूराव गायकवाड
ग्रामस्थांत संतापाची लाट
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळालेल्या कामावर गदा आणण्याच्या हालचालींमुळे सिद्धार्थ नगरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून






