आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
अणदूर येथील जवाहर महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख व ग्रीन क्लब समन्वयक डॉ.सत्येंद्र राऊत संपादित निसर्ग काव्यसंग्रहाची ACE या संस्थेने जागतिक रेकॉर्डबुकमध्ये नोंद घेतली. जागतिक पातळीवर या काव्यसंग्रहाची निवड झाल्याबद्दल ACE या संस्थेच्या डाॅ. वंदना गुप्ता व अनिता गुप्ता यांच्या हस्ते मुंबई येथील ताज महाल पॅलेसमध्ये प्रा.राऊत यांना जागतिक रेकार्डबुकचे प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्ये असे आहेत कि महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील 135 कवी व कवयित्रींच्या निसर्ग विषयावरील कविता आहेत.या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून समाजात निसर्गाविषयी आत्मीयता व पर्यावरणाचे जतन करण्याचा अनमोल संदेश दिला गेला आहे. यात शैक्षणिक, सामाजिक व सिने क्षेत्रातील मान्यवरांचे मनोगत आणि शुभेच्छा सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत. हा काव्यसंग्रह प्रत्येक लेखक, शिक्षक, विद्यार्थी, कवी व निसर्गप्रेमींना नक्कीच प्रेरणा देणारा व आवडणारा आहे. अणदूर येथील प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत व सहशिक्षिका दीपमाला खडके आणि ऐश्वर्या कदम यांनी हा काव्यसंग्रह विचारपूर्वक संपादित केला असून या तिन्ही संपादकाच्या प्रयत्नांमुळे अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्याची निर्मिती झाली आहे. या काव्यसंग्रहाची जागतिक पातळीवर नोंद झाल्याबद्दल
संस्थेचे सचिव मा. रामचंद्र दादा आलुरे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा.भालचंद्र बिराजदार व ज्येष्ठ विधीज्ञ श्री. लक्ष्मीकांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधु भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आदर्श पत्रकार श्री. विजय पिसे सर यांनी सर्व संपादकांचे अभिनंदन केले.






