अणदूर, प्रतिनिधी (आवाज महाराष्ट्र न्यूज)
सोलापूर येथील सुप्रसिद्ध कान, नाक, घसा (ENT) तज्ञ व सर्जन डॉ. दिपेंद्र हुली (M.B.B.S., M.S. ENT) यांनी अणदूर येथे आपल्या वैद्यकीय सेवेस सुरुवात केली आहे. यामुळे अणदूर व परिसरातील नागरिकांना आता ENT संबंधित तज्ञ उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
डॉ. दिपेंद्र हुली हे सोलापूर व परिसरात अनुभवी ENT तज्ञ म्हणून ओळखले जात असून कानदुखी, ऐकू न येणे, नाकाचे विकार, सायनस, घशाचे आजार तसेच कान-नाक-घसा शस्त्रक्रियांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने त्यांनी अणदूर येथे सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. हुली हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी अणदूर येथील साई समर्थ क्लिनिक, अप्पण्णा आलुरे कॉम्प्लेक्स, मेन रोड, अणदूर येथे रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
OPD नाव नोंदणीसाठी नागरिकांनी मोबाईल क्रमांक 8055098895 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सेवेमुळे अणदूर व परिसरातील नागरिकांना तज्ञ व दर्जेदार ENT उपचार सहज उपलब्ध होणार असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.






