डॉ.अर्चना गंगावणे उर्फ भाले यांना पी एचडी पदवी प्रदान सर्वत्र कौतुक
नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे
उमरगा येथील आदर्श महाविद्याल उमरगा येथील मराठी या विषयातून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठातून पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा संशोधन विषय त्यागमूर्ती “ माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर लिहीलेल्या निवडक गीतांचा विवेचक अभ्यास”असा होता. हे संशोधन प्रा डॉ. प्रभाकर कांबळे , आदर्श महाविदयालय उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
माता रमाई भिमराव आंबेडकर यांचं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील स्थान त्यागमूर्ती आणि भक्कम असे होते.बाबासाहेबांच्या जागतिक विद्वत्तेमागे रमाईचा अथांग त्याग आणि मुक सोशिकता हेच खरे बळ होते.त्या केवळ पत्नी नव्हत्या. तर दलित स्त्रियांसाठी प्रेरणास्थान होत्या.त्यांच्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाला बलाढय आसे महान संविधान देऊ शकले. या अनुषंगाने त्यांच्यावर आतापर्यंत लिहिल्या गेलेल्या आणि प्रकाशित झालेल्या काही निवडक गीतांचा आणि अप्रकाशित/ उपेक्षित राहिलेल्या रमाईवरील गीतांचा परामर्श या प्रस्तुत संशोधनामध्ये करण्यात आलेला आहे. आणि एका स्त्रीचे म्हणजे त्यागमूर्ती रमाईचे डॉ बाबासाहेबाच्या जडणघडणीमध्ये कसे योगदान आहे हे महत्त्व विषद केलेले आहे.
या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार व मार्गदर्शकांनी त्यांचे कौतुक अभिनंदन केले आहे.






