spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नय्यरपाशा जागीरदार यांची निवड 

तर सभागृह गटनेता म्हणून काँग्रेसचे मारुती खारवे व भाजपाचे दत्तात्रय दासकर यांची निवड

———————————————

स्विकृत नगरसेवक म्हणून सोनार व मातंग समाजातील तरुणाला प्रथमच संधी 

———————————————

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग नगर परिषद नळदुर्ग उपाध्यक्ष पदाची निवडणूक संपन्न झाली यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नय्यरपाशा जागीरदार तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मारुती खारवे हे उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यामध्ये नय्यर पाशा जागीरदार यांना हात उंचावून १२ मते पडली तर राष्ट्रीय काँग्रेसचे मारुती खारवे यांना नऊ मध्ये पडले यामधून नय्यर पाशा जागीरदार यांची नळदुर्ग नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासाठी पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष बसवराज धरणे हे होते याबरोबर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली उपनगराध्यक्ष पदाची निवड होताच नगराध्यक्ष बसवराज धरणे , गटनेते दत्तात्रय दासकर , राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नय्यर पाशा जागीरदार यांचा सत्कार केला

यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोन्ही पक्षाचे गटनेता व उपनेता निवडण्यात आला यावेळी भाजपाचे दत्तात्रय अंबादास दासकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली तर उपनेता म्हणून भाजपाचे तानाजी कोंडीबा जाधव यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रीय काँग्रेसचे मारुती सुदाम खारवे यांचे गटनेता म्हणून निवड करण्यात आली तर उपनेता म्हणून आकाश दिलीप कुलकर्णी यांची निवड करण्यात आली यावेळी नळदुर्ग नगर परिषदे मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडली याचबरोबर स्वीकृत सदस्य म्हणजे अनेक विषयाला अनुसरून तज्ञ लोकांची निवड करण्यात येते यामध्ये नळदुर्ग शहरातील हुशार व्यक्तिमत्व पत्रकार सुधीर बाबुराव पोतदार यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली तर भाजपच्या वतीने प्रविण धनराज गायकवाड यांची निवड करण्यात आली दोन्हीही समाजाच्या तरुणाला युवकाला प्रथमच नगर परिषदेच्या सभागृहात आपली मते मांडण्याचे संधी मिळाली आहे त्यामुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी नळदुर्ग नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे उपनगराध्यक्ष निय्यर पाशा जहागीरदार , भाजपाचे गटनेते दत्तात्रय दासकर , राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे , नगरसेवक रिजवान काझी , निरंजन राठोड , छमाबाई राठोड अपर्णाताई बेडगे राणी सुरवसे , जुलेखा बेगम इनामदार , श्रीमती बागवान , कमल गायकवाड , इमाम शेख , शशिकांत पुदाले ,साक्षी नळदुर्गकर , तानाजी जाधव , मीनाक्षी काळे , सुमन ठाकूर , मुन्नाबी कुरेशी , आकाश कुलकर्णी , सुधीर पोतदार प्रवीण गायकवाड

आधी जण उपस्थित होते यावेळी नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते नळदुर्ग शहर या ऐतिहासिक शहरांमध्ये पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे निवडणूक पार पाडली असून या निवडणुकीतील सर्व पदाधिकारी व सन्माननीय नगरसेवकाचे कौतुक अभिनंदन होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या