जिल्हा प्रतिनिधी(शाम नागिले) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेच्या विरोधी पक्ष गटनेते पदी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे नुतन नगर सेवक तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मारुती सुदाम खारवे यांची एकमताने निवड झाल्या बद्दल तसेच स्वीकृत न. प.सदस्य म्हणून पत्रकार सुधीर पोतदार यांची निवड झाल्या बद्यल व नुकतंच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग चार मधून विजय संपादन केलेले नूतन नगरसेवक आकाश कुलकर्णी यांचा मित्र परिवारांच्या वतीने डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे सत्कार करण्यात आला.
या बाबत सविस्तर असे की, नळदुर्ग नगर परिषदेच्या विरोधी पक्ष गटनेते पदी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे नुतन नगर सेवक तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मारुती सुदाम खारवे यांची एकमताने निवड झाल्या बद्दल मित्र परिवारांच्या वतीने डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना नगरसेवक तथा गटनेते मारुती खारवे म्हणाले की जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला नगरसेवक म्हणून निवडू देवून जनसेवा करण्याची संधी दिली तर माझे सर्व सहकारी नगरसेवक बांधव आणि पक्ष श्रेष्ठीने मला नळदुर्ग नगर परिषदेच्या विरोधी पक्ष गटनेता म्हणून निवड केली.आपण सर्वांनी माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी गटनेते पदाला योग्य तो न्याय देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन.
या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,रिपाइं (आठवले) चे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,दलित पॅंथरचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख शामकांत नागिले, आरपीआय (आठवले) चे तुळजापूर तालुका संघटक सुरेश लोंढे,आरविंद लोखंडे, बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.






