spot_img
spot_img
spot_img

प्रणय चिनगुंडे याचे राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत कांस्यपदक मिळवून घवघवीत यश.

जिल्हा प्रतिनिधी (शाम नागिले ) झारखंड रांची येते सुरू असलेल्या 69 व्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रणय मनीषा भागण्णा चिनगुंडे हा झारखंड रांची येते सुरू असलेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवून यश संपादन केले आहे.

या बाबत सविस्तर असे की, प्रणय मनीषा भागण्णा चिनगुंडे राहणार नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हा खेळाडू आता पर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी आपली उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच 2025 मध्ये दिल्ली येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया मॅच साठी सुद्धा महाराष्ट्राकडून त्याची निवड झाली होती. तसेच केरळ त्रिवेंद्रम येथील SAI येथे त्याची निवड झाली होती. तो सध्या राष्ट्रीय कोच सौ दिपाली पाटील निकम मॅडम तसेच सौ दिपाली शिरदोळकर व श्री स्वप्नील माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे प्रशिक्षण घेत आहे.

लहानपणापासूनच खेळाचे बाळकडू त्यांना श्री तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथून मिळाले. त्यांची सुरुवात श्री योगेश थोरबोले सर तसेच श्री माऊली भुतेकर सर यांच्या प्रशिक्षणाखाली झाली. महाराष्ट्राचे क्रीडा संचालक माननीय श्री सबनीस सर व तसेच प्राचार्य सौ दिपाली पाटील निकम मॅडम तसेच धाराशिव चे क्रीडा अधिकारी नाईकवाडी सर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. समस्त नंदगाव गावकऱ्यांकडून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. वेगवेगळ्या सोशल माध्यमातून सुद्धा त्याचे कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या