spot_img
spot_img
spot_img

भाजपला सत्तेपासून हद्दपार करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकजुटीने लढा द्यावा – राजाभाऊ राऊत

धाराशिव प्रतिनिधी :

धाराशिव जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपापले मतभेद, अहंकार व कुरघोड्या बाजूला ठेवून एकसंघपणे मैदानात उतरले पाहिजे, असे ठाम व आक्रमक मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी व्यक्त केले आहे.

भाजपच्या सत्ताकाळात शेतकरी उद्ध्वस्त झाला, कामगारांचे हक्क हिरावले गेले, दलित-आदिवासींवर अन्याय वाढला, महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आणि युवक बेरोजगारीच्या गर्तेत लोटला गेला आहे. तरीही भाजप विकासाच्या खोट्या जाहिराती, पोकळ घोषणा आणि सत्तेचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता आली, तर भ्रष्टाचार, पक्षपाती कारभार, कंत्राटी राजकारण आणि लोकशाही मूल्यांची उघडपणे गळचेपी होणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

राजाभाऊ राऊत पुढे म्हणाले की, भाजपची सत्ता म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना कायमस्वरूपी कुलूप. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य व्यवस्थेची वाताहत, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, वीज प्रश्न, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी — या प्रत्येक मुद्द्यावर भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेच्या वेदनांवर फुंकर मारण्याऐवजी भाजप सत्तेच्या जोरावर विरोधक दाबण्याचे, संस्थांचा गैरवापर करण्याचे आणि संविधान पायदळी तुडवण्याचे काम करत आहे.

महाविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठीची आघाडी नसून संविधान वाचविण्याची, सामाजिक न्याय टिकविण्याची आणि लोकशाहीचे संरक्षण करण्याची लढाऊ चळवळ आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकदिलाने, एकत्र लढली तर धाराशिव जिल्ह्यात भाजपचा पराभव अटळ आहे आणि सत्तेचा माज उतरविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) ही धर्मनिरपेक्ष, पुरोगामी व संविधाननिष्ठ विचारांशी ठामपणे बांधील असून भाजपविरोधातील प्रत्येक लढ्यात महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

शेवटी राजाभाऊ राऊत यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना थेट आवाहन करत म्हटले की,

“भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे केवळ राजकीय गरज नाही, तर लोकशाही, संविधान आणि सामान्य जनतेच्या भवितव्यासाठीचा निर्णायक संघर्ष आहे. या संघर्षाची ठोस आणि निर्णायक सुरुवात धाराशिव जिल्ह्यातूनच झाली पाहिजे.”

राजाभाऊ राऊत

जिल्हाध्यक्ष, धाराशिव

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)

Related Articles

ताज्या बातम्या