spot_img
spot_img
spot_img

जळकोट मध्ये मोठा राजकीय भुंकंप काँग्रेसचे अशोक पाटील व जि. प. चे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांचा भाजपात प्रवेश : राष्ट्रीय कांग्रेसला मोठे खिंडार

जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील काँग्रेसचे माजी सरपंच अशोक पाटील व आलियाबाद येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण याचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला असून जळकोट येथे काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकराव चव्हाण याचे खंदे समर्थक कै.मोतीराम चव्हाण याचे चिरंजीव प्रकाश चव्हाण व जळकोट चे माजी सरपंच अशोक पाटील यांनी पूर्व नियोजीत जिल्हा परिषद निवडणुक लागताच पक्षांतर केल्याने कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून अशोक पाटील आणि प्रकाश चव्हाणांनी माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते मधुकर चव्हाण साहेबांची हाताची साथ सोडून हातात कमळ घेतले आहे .

या पक्ष प्रवेशासाठी भाजपाचे नेते सुनिल मधूकर चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या दोघांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिह पाटील जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी नितीन काळे मल्हार पाटील बाजार समितीचे सभापती अशिष सोनटक्के विलास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १९ जानेवारी रोजी प्रवेश देण्यात आला असून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नविन कार्यकर्त्यांस उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराला भाजपाचे जुने कार्यकर्ते त्यांना स्वीकारतील का ? हा प्रश्न सदया जळकोट मतदार संघात चर्चीला जात आहे

पक्षांतरामुळे महाविकास आगाडीला फायदा होऊल का महायुतीला हे येणार काळच सागेल .

या पक्ष पक्षप्रवेशा वेळी आलियाबाद च्या माजी सरपंच ज्योतीका चव्हाण माजी उपसरपंच कांत राठोड श्रीनिवास कदम सुनिल माने विनायक राठोड रामतिर्थचे सरपंच लक्ष्मण राठोड उपसरपंच थारू पवार शिवाजी राठोड लक्ष्मण चव्हाण अदित्य चव्हाण विश्वास भोगे सह असंख्य कार्यकर्ते यानी भाजपात प्रवेश केला आहे . सदया या पक्ष प्रवेशामळे पुढारी जोमात आहेत तर कार्यकर्ते कोमात असल्याचे जळकोट गटात चित्र पहावयास मिळत आहे .

Related Articles

ताज्या बातम्या