spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग शहरात घानीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घनकचरा व्यवस्थापन समिती कुठे आहे

टोपल्यानी पैसा व भरमसाठ सफाई कामगार असताना सफाई का होत नाही 

याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी : नगरसेवक खारवे 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे

घनकचरा व्यवस्थापन समिती असून अडथळा ” नसून खोळंबा ” या म्हणीप्रमाणे नळदुर्ग शहर एक स्वच्छ शहर बनवू आसे अनेक पदाधिकारी यांनी घोषणा केली आणि नाहिरनामा ही स्पष्ट केला परंतू निवडणुकीच्या नंतर मात्र नळदुर्ग शहरात घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याचे उघड झाले आहे

दर महिन्याला टोपल्याने पैसा आणि ढीगभर मनुष्यबळ असताना मग घाणीचे साम्राज्य कसे पसरले शहरातल्या गल्लीबोळात अनेक ठिकाणी पाहणी केली त्यासाठी गटारी तुडवून दिसल्या रस्त्यावरती केर कचरा ढिगारे दिसून आले

मग घनकचरा व्यवस्थापन समिती फक्त पैसा घेयालाच आहे

कुठे आहे घनकचरा व्यवस्थापन समिती आणि काय करत आहे या समितीमध्ये एकूण किती सफाई कामगार आहेत कोणत्या पदावर आहेत आणि शहरात स्वच्छतेचा माध्यमातून कोण कोणती स्वच्छता केली आहे याबाबतची मागणी जनतेतून होत आहे ज्या कंपनीने घनकचरा व्यवस्थापन समिती चालवण्यासाठी घेतली आहे ती कंपनी त्या कंपनीतीलसफाई कर्मचारी काय करतात , मग काम करत असतील तर घाणीचे साम्राज्य वाढले कसे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकाच्या खालच्या बाजूला जो चिकन कोंबड्यांचा पखे विखुरली गेलीत ती पखे आणि घाण केवळ शंभर फुटावरती टाकल्यामुळे परत याची महा दुर्गंधी बसस्थानकातील प्रवाशांना येत आहे याबाबतीत कोणाच्याही स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले दिसून येत नाही पक्षाच्या पखाचा खूप मोठा ढिगरा हायवे रोडच्या कडेवर पडलेला दिसून आला

रविवारी नळदुर्ग शहरात बाजार भरला जातो या बाजार लाईन मध्ये जिथे व्यापारी वर्ग तरकारी भाजी घेऊन विकण्यासाठी बसतो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून आले अनेक नागरिक अनेक व्यापारी अक्षरशः पोटाची खळगी भरण्यासाठी गटारी वरती फरशीवर टाकून बसलेले दिसून आले नळदुर्ग नगर परिषदेतील राष्ट्रीय काँग्रेसचे सभागृहाचे गटनेते मारुती खारवे यांनी नळदुर्ग शहरातील आठवड्याच्या बाजारातील पाहाणी केली त्यावेळेस हे सर्व प्रकार निदर्शनास आला त्यांनी तात्काळ ॲक्शन घेतले .

भरमसाठ सफाई कामगार लाखो रुपये घनकचरा व्यवस्थापनावर खर्ची होत असताना एवढे घाणीचे साम्राज्य आले कुठून दर महिन्याला टोपल्याने पैसा जातो मग हा पैसा जातो कुठे घनकचरा व्यवस्थापन समितीच्या मार्फत करण्यात येणारे नळदुर्ग शहराची स्वच्छता ही काळाची गरज असताना केवळ नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे हे घाणीचे साम्राज्य वाढल्याचे दिसून येते आहे घनकचरा व्यवस्थापन समिती आणि त्यामधील नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील अधिकारी यानी सफाई कामगारावर करडी नजर ठेवायला पाहिजे . तो कर्मचारी काम करतो का नाही का? “दिन जाव गंड्डेआव ” म्हणीप्रमाणे दिवसावर वेळ घालवितो याचीही चौकशी होणे गरजेचे आहे

नगरपालिकेचे कर्मचारी तथाव्यवस्थापन समिती मधील सफाई कामगार एखाद्या अधिकाऱ्याने किंवा लोक प्रतिनिधीने त्यामधील सफाई कामगारांना काम करण्यास सांगितल्यास केवळ रडक्याचे डोळे पुसल्यासारखे काम करतात हे वस्तुस्थिती आहे

आपण प्रत्यक्षात या संदर्भात पाहणी करावी जेणेकरून नळदुर्ग शहराच्या कायापालट होईल आणि नळदुर्ग शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर आसणे गरजेचे आहे याबाबतची सर्व चौकाशी व्हावी याबाबती असा लेखी निवेदन राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सभागृहांचे नवनिर्वाचित गटनेते मारुती सुदाम खारवे व उपनेते आकाश दिलीपराव कुलकर्णी , नगरसेवक सुधीर बाबुराव पोतदार यांनी नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे

Related Articles

ताज्या बातम्या