spot_img
spot_img
spot_img

अणदूर पंचायत समिती गटातून वंचित बहुजन आघाडीचे आर.एस. गायकवाड निवडणूक रिंगणात

नळदुर्ग (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अणदूर जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आर.एस. गायकवाड यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या थेट, निर्भीड आणि संघर्षशील भूमिकेमुळे विरोधी पक्षांसमोर गंभीर आव्हान उभे राहिले असल्याची चर्चा रंगली आहे.

अणदूर (ता. तुळजापूर) येथील रहिवासी असलेले आर.एस. गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील कट्टर, लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. समाजातील अन्याय, अत्याचार आणि दुर्लक्षित प्रश्नांवर त्यांनी आजपर्यंत उपोषणे, आंदोलने व संघर्षाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवत ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी अणदूर जि.प. गटातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी दाखल केल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

सध्या महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीचे वातावरण पोषक असून आंबेडकरी विचारांशी निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे आर.एस. गायकवाड यांची उमेदवारी ही केवळ एक निवडणूक नसून, विचारांची, निष्ठेची आणि संघर्षाची लढाई असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अनेक जिल्हा परिषद गटांत वंचित बहुजन आघाडीला उमेदवार न मिळण्यामागे दलाल प्रवृत्ती, मत फोडणारे खापरे आणि संधीसाधू लोक कारणीभूत ठरल्याची खंतही गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. “पक्षासाठी लढण्याची भाषा करणारे अनेक जण ऐनवेळी फोन बंद करून पळ काढतात, तर काही जण नातेसंबंधांच्या जोरावर तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशाच लोकांमुळे चळवळीला पराभव पत्करावा लागतो,” असा घणाघात त्यांनी केला आहे.

आज मात्र स्पष्ट संदेश दिला जात आहे —

नेते एकत्र येतात की नाही, हा प्रश्न गौण आहे.

खरा प्रश्न आहे : समाज म्हणून आपण एकत्र येणार आहोत का?

आज गरज आहे ती आंबेडकरवादी समाज एकसंध उभा राहण्याची.

दलाल, खापरे आणि संधीसाधूंना नाकारून —

“आम्ही आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी आहोत”

हे मतदानातून, रस्त्यावरून आणि संघर्षातून दाखवण्याची हीच वेळ आहे.

👉 बाळासाहेबांना साथ द्या

👉 विचारांना साथ द्या

👉 आणि दलालांचा कायमचा राजकीय बंदोबस्त करा

फुटीने आपण हरतो,

एकतेनेच आपण इतिहास घडवतो.

✊ जय भीम | समाज एकत्र आला तर सत्ता दूर नाही

✊ प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठाम उभे राहा.

— आपला,

आर.एस. गायकवाड

जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, धाराशिव

Related Articles

ताज्या बातम्या