अणदूर (प्रतिनिधी) :- तेरणा युथ फाऊंडेशनच्या वतीने तुळजापूर तालुका युवक मेळावा शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचा शुभारंभ आई श्री. तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच महंत योगी मावजीनाथजी महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटारण्य महाराज यांच्या शुभाशीर्वादाने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आदरणीय मेघदादा राणाजगजितसिंह पाटील हे होते. त्यांनी तेरणा युथ फाऊंडेशनच्या युवकांना मार्गदर्शन केले. मेघदादांनी तेरणा युथ फाउंडेशनचे महत्त्व उद्दिष्ट समजावून सांगत, तालुक्यातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिल,उद्योग व्यवसाय करण्यासाठी चालना देणार, प्रामुख्याने गाव तिथं व्यायामशाळा उभारणीचा संकल्प केला तो पुर्णत्वास नेणार, शैक्षणीक बाबतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सामग्री उपलब्ध करून देणार. भविष्यातील युवकांचे सर्व अडचणी दूर करण्यासाठी पाठबळ हे तेरणा युथ फाउंडेशन असणार असं ही मेघदादा म्हणाले,युवक व युवतींनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत उद्योग व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले.
मेघदादा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वावर आणि तेरणा युथ फाउंडेशनच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आदरणीय राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाने तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी राजकुमार गाढवे व तालुका सहसचिव पदी स्वप्निल घुगे यांची तर निलेश आलुरे यांची अणदूर गट प्रमुख पदी निवड करण्यात आली.