अणदूर प्रतिनिधी :- काल हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेच्या नर्सिंग कॉलेज मध्ये नवीन बॅच 2024-25 च्या मुलींचे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक चिंचोले व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. बसवराज नरें, अणदूरचे पोलीस पाटील जावेद शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने करून उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रास्ताविक कॉलेजच्या अध्यापीका प्रीती पंडित यांनी केले व द्वितीय वर्षातील मुलींनी प्रथम वर्षातील (2024 बॅच) च्या मुलींचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले आणि सर्व मुलींनी आपला सविस्तर परिचय करुन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माननीय डॉक्टर चिंचोले सर यांनी मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले की नर्सिंग कोर्स हा अर्थजन्य बरोबर सेवेचीही संधी मिळवून देतो सेवाभाव वृतीने काम करण्यासाठी आपण निवडलेले नर्सिंग कोर्स हा लोकांच्या सेवेमधून मनाला समाधान देणारे व सहकार्य करणारे आहे. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शासकीय अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते तसेच आपल्या कुटुंबाची व स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे देखील या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला समजू शकते त्यामुळे नोकरीसाठीच हे शिक्षण आहे असं न समजता स्वतःच्या कुटुंबाची व आपल्या स्वतःच्या शरीराची निगा कशी राखावी शरीरिक आरोग्य काय आहे याचे शिक्षण यातून मिळते हे खूप महत्त्वाचे आहे. आपण नर्सिंग कोर्स निवडला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करून या कोर्समध्ये आजच्या दिनी स्वागत समारंभ कार्यक्रमांमध्ये स्वागत करून पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरीची संधी मिळावी अशा शुभेच्छा दिल्या.
दुपारच्या सत्रात सर्व मुलींनी विविध ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तसेच खेळ गाणी डान्स अशा विविध स्पर्धा घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले हे कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी कॉलेजच्या दोन्ही अध्यापिका प्रीती पंडित व प्रतिभा सोनकटले संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते बसवराज नरे, जावेद शेख यांनी परिश्रम घेतले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पांचाळ यांनी केले व सर्व पाहुणे मांडळी व नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीचे प्रतिभा सोनकठले यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या दोन्ही वर्गाच्या मुलींनी मिळून एकत्रित स्नेहभोजनाचा अस्वाद घेतला.