spot_img
spot_img
spot_img

अणदूर गावात १६ व वित्त आयोग निधी खर्च आढावा बैठक संपन्न

 

 

अणदूर प्रतिनिधी :- काल दिनांक 06/02/2025 रोजी अणदूर गावातील हुतात्मा स्मारक सभागृहामध्ये 16 वा वित्त आयोग निधी खर्च संबंधित आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री रामचंद्र बसवणप्पा आलूरे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार माजी सरपंच श्री धनराज मुळे ग्रामपंचायत सदस्य विवेक बिराजदार बालाजी घुगे , श्री. बाळकृष्ण घोडके, सौ. घुगरे ताई, पोलीस पाटील जावेद शेख ग्रामसेवक श्री माशाळे साहेब ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या आशा कार्यकर्त्या शाळेचे मुख्याध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

कालच्या आढावा बैठकीत एकूण शंभर टक्के निधी पैकी 60% बंधित निधी व 40% अबंधित निधी असणार आहे. 40 टक्के अबंधित निधीतील 25% शिक्षण,आरोग्य, उपजीविका,रोजगार इत्यादीसाठी खर्च करणे अपेक्षित असून दहा टक्के निधी हा महिला बालकल्याण साठी खर्च करणे अपेक्षित आहे तसेच उरलेले पाच टक्के निधी हा इतर कामासाठी खर्च करता येऊ शकते.

उपस्थित सर्व अंगणवाडी कार्यकर्ती व शाळेचे मुख्याध्यापक यांना आपल्याला लागणाऱ्या साहित्यांची किंवा गरज असलेल्या गोष्टींचे लेखी मागणी पत्र तयार करून उद्याच ग्रामपंचायत मध्ये जमा करावे जेणेकरून त्यावरती विशेष बैठक आयोजित करून निधीचे व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल असे ग्रामसभेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र दादा आलुरे यांनी सांगितले.

बैठकीतील मुद्दे :-

१. १०० % निधी पैकी ६० % बंधित निधी (स्वच्छता आणि पाणीपुवठा विषयक बाबी) आणि ४० अबंधित निधी
२. अबंधित निधी पैकी २५ % निधी शिक्षण, आरोग्य व उजीविका आणि आरोग्यासाठी खर्च करावा.
३. अबंधित निधीतील १० % निधी महिला व बालकल्याण साठी
४. उर्वतील ५ % निधी इतर कामासाठी वापरण्यात येईल

Related Articles

ताज्या बातम्या