spot_img
spot_img
spot_img

काव्यरचना पाठवण्याचे आवाहन

 

अणदूर प्रतिनिधि :- जवाहर महाविद्यालय अणदूर, येथील संस्कृत विभाग आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग या विषयावर राज्यस्तरीय प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार असून याकरिता कविता कोणीही पाठवू शकतील. तेंव्हा निसर्ग या विषयावरील काव्यसंग्रहासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा. कविता ही जास्तीत जास्त 20 ओळीची आणि स्वरचित असावी तसेच कुठल्याही प्रकारची कविता कॉपी पेस्ट असू नये. आपली स्वरचित कविता आय एस बी एन नंबर असलेल्या काव्यसंग्रहात प्रकाशित करण्यात येईल. निसर्ग काव्यसंग्रहात सहभाग घेणार्या सर्व कवी आणि कवयित्रींना काव्य लेखनाचे राज्यस्तरीय आकर्षक प्रमाणपत्र व काव्यसंग्रहाची एक प्रत देण्यात येईल. कविता पाठवताना आपले पूर्ण नाव व पत्ता आणि मोबाईल नं. देणे आवश्यक आहे. आपली स्वरचित कविता दि.५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांच्या 8208740880 या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा rautsatyendra07@gmail.com या मेलवर पाठवण्यात यावी.असे आवाहन संस्कृत विभाग प्रमुख व ग्रीन क्लब समन्वयक प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांच्या मो. 738739 4747 तसेच 8208740880 या नंबरवर संपर्क साधावा.

संपर्क :-
प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत
भ्रमणध्वनी क्र :- 73 87 39 47 47  / 82 08 74 08 80
व्हॉट्सॲप :- 82 08 74 08 80
ई- मेल आय डी :- rautsatyendra07@gmail.com

Related Articles

ताज्या बातम्या