spot_img
spot_img
spot_img

महात्मा बसवेश्वरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी अक्कलकोट येथील बसव प्रेमींनी केली.

अक्कलकोट प्रतिनिधी :-कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काही  समाज कंटकांनी विटंबना केली त्या समाज कंटकांना त्वरित अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांच्या माध्यमातून कर्नाटक राज्यसरकारला अक्कलकोट येथील बसव प्रेमींनी माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात केली. त्याप्रसंगी बोलतांना शिवशंकर स्वामी म्हणाले १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण विश्वाला संसदेची रचना दिली समतेची विचार दिले अशा महापुरुषाच्या पुतळ्याचे विटंबना केलेल्या अश्या समाज कंटकांना कर्नाटक सरकार त्वरित अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होईल असे आव्हान दिले.

या निषेध आंदोलनात राहुल वाडे, रुद्रय्या स्वामी, शिवराज जकापुरे, आनंद बुक्कानूरे, शिवशंकर स्वामी, मल्लिनाथ खूबा, धर्मराज गुंजले, निखिल पाटील , प्रसन्न गवंडी, धनराज पाटील, ऋषिकेश लोणारी, मदन राठोड , प्रितीश किलजे, सौरभ हलके, रोहित देशमुख , सौरभ स्वामी, सिद्धू माळी, आतिश पवार, सत्यजित लोके, आकाश बाळीकाई, अशोक जाधव , शरणू कापसे, दीपक रोडगे, राज मद्रीकर , सागर शुक्ला, नागराज होळीकट्टी, केदार माळशेट्टी, अनिल माने , अनिल नागनसुरे, सुरेश नागुर, यश कडगंची, भीमा जडगे, मल्लीनाथ पाटील , सचिन नडगिरे, विरेश स्वामी, आदर्श पडणूरे, जयदीप अंजुटगी, देविदास कवटगी इत्यादीसह अनेक बसवप्रेमी शहर व तालुक्यातून उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या