अध्यक्षपदी संजय कुंभार तर सचिवपदी महादेव घोगरे यांची निवड
आवाज महाराष्ट्र रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
महाराष्ट्रातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना एस.टी कामगार संघटना धाराशिव विभागातील उमरगा आगार सन 2025 ची पदाधिकारी कार्यकारणी महाराष्ट्र एसटी को-ऑपरेटिव बँक संचालक जयवंत जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संजय कुंभार तर सचिवपदी महादेव घोगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इतर कार्यकारणी मध्ये कोषाध्यक्षपदी नूरसे एम.एस, (चालक ), सहकोषाध्यक्ष शिवशरण ढंगे,कार्याध्यक्षपदी तानाजी घंटे (वाहक ), प्रसिद्धीप्रमुख शरद पवार ( वाहक ) यांची निवड करण्यात आली. एस.टी. कामगार संघटना कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरली आहे. या कार्यकारणी निवड प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांनी अनेक प्रश्न मांडले. त्या प्रश्नावरती प्रशासनाकडे त्याच्या पाठपुरावा करून लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन नवनियुक्त अध्यक्ष व सचिवांनी कर्मचाऱ्यांना दिले. या कार्यक्रमाला आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, लिपिक, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.