spot_img
spot_img
spot_img

जळकोटच्या श्री कुलस्वामिनी आश्रमशाळेत वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

आवाज महाराष्ट्र न्यूज: रिपोर्टर विजय पिसे जळकोट

दिनांक: २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. या स्नेह संमेलनात इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांने अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. श्री गणरायाच्या भक्ती गीताने कार्यक्रमाचे सुरवात करण्यात आली , एकच राजा इथे जन्माला… ढोलना, आदिवासी नृत्य, ऐ मेरे वतन के लोगों, टिपरी, लेझीम नृत्य, नाचरे मोरा आंब्याच्या बनात, अंबे मागतो जोगवा, गोंधळ गीत, , मराठी रिमिक्स डान्स, हिंदी रिमिक्स डान्स, महादेव तांडव नृत्य, सखी मारवाडी, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य.. स्वच्छता वर आधारित गाडीवाला आया कचरा निकालो , बंजारा गीत लाली पिली बांगडी असे एकापेक्षा एक सरस डान्स सादरीकरण झाले. या डान्सला मार्गदर्शन श्रीमती प्रा.ज्योतिका चव्हाण श्रीमती कुंचगे पी.एस. श्रीमती चौगुले एस.बी.श्रीमती सोनाली चव्हाण,श्रीमती अश्विनी लबडे,कुमारी मयुरी कांबळे ,श्री ढोले के.ए. हक्के बी.जी. व कारले के.बी. यांनी केले. स्नेह संमेलनासाठी पांढरे डी.एम. कोकाटे एस.एम.राठोड बी.बी.साबळे ए.एच. दुधभाते एस.एन यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी श्री.गजेंद्र पाटील सरपंच जळकोट, आशिष सोनटक्के सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर ,राजू पाटील माजी चेअरमन ,माणिकराव चव्हाण माजी नायब तहसिलदार सुभाष नाईक माजी उपसरपंच अलियाबाद माजी जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट सचिव तथा प्राचार्य संतोष चव्हाण, उपसरपंच अलियाबाद अमृता चव्हाण , पोलीस पाटील शिवाजी चव्हाण इंदिरा गांधी आदर्श माध्यमिक आश्रम शाळा होर्टी मुख्याध्यापक विनायक राठोड,नागेंद्र गुरव,रवीकिरण चव्हाण तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अलियाबाद,रामतीर्थ, बोरमण तांडा,येडोळा,जळकोट येथील विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, महिला भगिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कांबळे यांनी केले तर संपूर्ण व्हिडिओ चित्रिकरण अमित खारे व दुर्गेश कदम यांनी केले. शेवटी आभार मुखम बी.एस. मानले.

Related Articles

ताज्या बातम्या