spot_img
spot_img
spot_img

प्रयाग मल्टीस्टेटला सलग दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबर पुरस्कार

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सलग दुसऱ्यांदा सहकार व बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल बँको ब्लू रिबन पुरस्कार लोणावळा येथे एका खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. बँकिंग व सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रयाग मल्टीस्टेटला अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्यातर्फे आयोजित अडवांटेज सहकार परिषद २०२५ यांच्या वतीने देण्यात येणारा बँको ब्लू रिवन २०२४ रु .१ कोटी ते रु .५० कोटी या गटात हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त पुणे चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात दिनांक ३०/०१/२०२५ वार गुरुवार रोजी प्रदान करण्यात आला. प्रयाग मल्टीस्टेटचे तज्ञ संचालक जाधव मोहन, अरविंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कदम सुनील हा पुरस्कार यांनी स्वीकारला. प्रयाग मल्टीस्टेटने सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँको ब्लू रिबन २०२४ हा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती प्रयाग मल्टी टेस्ट चेअरमन ऍड. सचिन कदम यांनी दिली. चेअरमन ऍड. सचिन कदम यांनी सांगितले की प्रयाग मल्टीस्टेटने गेली बारा वर्षाच्या वाटचालीत अनेक माईल स्टोन घडण्याची कामगिरी केली आहे. बारा वर्षात ग्राहकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा विश्वास जोपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जोडले असून आर्थिक क्षेत्रात काम करत असताना. महिलांना फक्त अर्थपुरवठा करूनच न थांबता त्यांच्यातील कौशल्य वृद्धीवर भर देत आहे. शेतकरी कर्ज योजना अशा प्रकारचे विविध कर्ज व विविध ठेव योजना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड. सचिन कदम, व्हा. चेअरमन मनोज कदम, सीईओ सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला आहे. प्रयाग मल्टीस्टेट आर्थिक क्षेत्र सोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे प्रयाग मल्टीस्टेटचे चे जनरल मॅनेजर जाधव दिगंबर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या