spot_img
spot_img
spot_img

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का येथील आंबेडकर भवनासाठीच्या जागेसाठी एकत्रित या दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांच्या कडून जाहिर आवाहन

प्रतिनिधि नंदगाव (शाम नागिले) डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन मालधक्का येथील आंबेडकर भवनासाठी असणारी दोन एकर जागा बांधकाम व्यवसायिकाच्या घशात घालण्याचे काम शासन, प्रशासनाने केल्यामुळे अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे एकही उचित असे स्मारक नसल्यामुळे आंबेडकर भवनाला लागून असलेली पीडब्ल्यूडी ची जागा भवनासाठी मिळावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून कागदोपत्री संघर्ष चालू होता. परंतु त्यास अपयश आले आहे. 2000 सालापासून पुणे महानगरपालिकेने तसा ठराव पास केला होता. त्यानंतर 2016 मध्ये मुख्यमंत्री यांनी देखील ही जागा आंबेडकर भवनासाठी देण्यात यावी असा शेरा मारला होता. परंतु आता विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर शासनातील काही राज्यकर्त्यांनी 500 कोटी ची जागा अवघ्या 60 कोटी मध्ये खाजगी बांधकाम व्यवसायकाला दिली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि आंबेडकरी चळवळीने केलेल्या मागणीला काळिंबा फासणारी आहे म्हणून ही आमच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी व जन आंदोलनाची भूमिका घेण्यासाठी,आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष, संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने या मोर्च्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मतभेद मनभेद अनेक गटातटाचे पायताने बाजूला ठेवून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकासाठी एकत्रित येऊन लढा उभा करूया आणि त्याचाच विचार करण्यासाठी आंबेडकरी जनतेच्या एकीसाठी या महत्वपूर्ण मोर्च्या आयोजन करण्यात आले असून आपली उपस्थिती अत्यंत महत्वाची असून दिशा देणारी नक्कीच असेल यामध्ये शंकाच नाही मला खात्री आहे आपण मोठ्या संख्येने उद्या 07/02/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर या मोर्चेस हजर राहावे असे आवाहन दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी केले आहे .अधिक माहिती साठी दलित पँथर कार्यालयीन सचिव अजिंक्य मस्के यांच्याशी संपर्क करावे .

Related Articles

ताज्या बातम्या