नळदुर्ग प्रतिनिधि.रेणुका माता महिला बचत गट नळदुर्ग अंतर्गत हळदी कुंकू आणि विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात 40 ते 50 विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी 400 ते 500 महिला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माजी मॅनेजर सौ कल्पनाताई परळकर आणि प्रमुख पाहुण्या विकास सोसायटी नळदुर्ग सदस्य सौ उमाताई जाधव, अक्षरवेलच्या माजी अध्यक्ष सौ राधिकाताई मिटकर, सामाजिक कार्यकर्त्या शाहिराती सय्यद, सुमन फुले, सौरंजनाताई कानडे त्याच बरोबर कार्यक्रमाचे वक्तृत्व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग च्या प्राध्यापिका जयश्रीताई घोडके आणि अंबाबाई महिला बचत गट जळकोट च्या अध्यक्ष कस्तुराताई कारभारी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी गायकवाड यांनी केले आणि प्रस्तावना व कार्यक्रमाचे आयोजक कल्पनाताई गायकवाड यांनी केले. आभार आणि कार्यक्रमाची सांगता ज्योती शिंदे यांनी केली. कार्यक्रमाची सजावट आणि आकर्षक देखावा मुक्ता शिंदे,अश्विनी शिंदे, लक्ष्मी कासार, महानंदा जाधव, छकुली शिरोळे यांनी केली. या कार्यक्रमाचे विशेष लक्ष वेधून घेणारा सामाजिक संदेश “सर्व महिलांनी घेतलेली प्रत्येक स्त्रीने प्रत्येक विधवा महिलांशी सन्मानाची व मानाची वागणूक देऊन शुभकार्यात सहभाग करून घ्यावे” अशी शपथ सर्व उपस्थित महिलांनी घेवून कार्यक्रमाचा समारोप केला.