नंदगाव प्रतिनिधी (शाम नागिले )तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत 10 च्या विध्यार्थी यांचे निरोप समारंभ व 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या विविध संस्कृती व क्रीडा स्पर्धा यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आले.
या बाबत सविस्तर व्रत असे की तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत 10 च्या विध्यार्थी यांचे निरोप समारंभ व 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या विविध खेळ व संस्कृती व क्रीडा स्पर्धा यांचे बक्षीस समारंभ घेण्यात आले व ज्या विध्यार्थीनि खेळत व कार्यक्रमात पहिला ,दूसरा व तिसरा क्रमांक पटकावले त्यांना बक्षीस देण्यात आले . व शाळेतील विध्यार्थी व शिक्षक यांनी कोंटरमिशन करून संपूर्ण शाळेतील विध्यार्थी व प्रमुख पाहुण्यांना गोड जेवण देण्यात आहे . या कार्यक्रमाच्या वेळी प्रथमता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समिति अध्यक्ष सतीश बशेट्टी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, व आपके चरनो मे है अमन स्वागत स्वागत या गाण्याने सुरुवात घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापक वाकडे सर म्हणाले की आपल्या आई वडिलांने केलेल्या ऋणाच्या परत फेड म्हणून त्यांचे संगोपन करा व त्यांना आश्रमात ठेऊ नका त्यांचे आदर करा व सन्मान करा . व गावकर्यांना विनती केली की गावांनी गावकी म्हणजे राजकारण शाळेत आणू नये व शिक्षकांनी शाळा गेटच्या बाहेर नेऊ नये त्या मुळे आपली शाळा व्यवस्थित राहील व आपण इथे शिक्षण सुधारले पाहिजे, इथे गुणवंत्ता सुधारली पाहिजे, इथे विध्यार्थी सुधारले पाहिजे यावर सर्वात जास्त भर दिला पाहिजे .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक दशरथ काटे सर ,दलित पँथर धाराशीव संपर्क प्रमुख तथा पत्रकार शाम नागिले, गावाचे पोलिस पाटील किरणकुमार भाले , ग्रामपंचायत सदस्य नागू पाटील , समिति सदस्य रोहिदास कांबळे ,शिवानंद शरणार्थी , कल्याणी कोरे , सुनील सुरवसे ,सागर पाटील ,सचिन कोरे , लिंबाजी गुड्डे, सचिन करंडे, नंदिनी हालसे,जयश्री भाले आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.बी.खंदारे, एम.टी.धोत्रे, एम.के.कुंभार, एच.जी.उपासे, आर.एस. वायकर, डी.डी.कदम, टी.डी. पंडित, लिपिक एन.एच. सगर, शिक्षिका श्रीमती एस.डी.आडे,श्रीमती ए.एस. आवते, श्रीमती डी.जे.मंडले, धोंडीराम राठोड सर ,जाधव सर , शिपाई जमादार बाई आदींनी मोठे परिश्रम घेतले .