प्रतिनिधी:- मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळ अंतर्गत माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधुन हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार ही कऱण्यात आले.
सत्कार मूर्ती माजी जिल्हा प. अध्यक्षा सौ. अस्मिता ताई कांबळे तसेच लेडीज क्लब च्या अध्यक्षा व जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पाटील सौ, अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील . यांचे सत्कार मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळ अध्यक्ष लक्ष्मी राजकुमार गायकवाड व सचिव व लक्ष्मी बुद्धभूषण सूर्यवंशी यांनी केल्या. तसेच मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळ अध्यक्ष लक्ष्मी राजकुमार गायकवाड व सचिव लक्ष्मी बुद्धभूषण सूर्यवंशी यांचा सत्कार अस्मिता ताई व अर्चनाताई पाटील यांनी केले.
पोर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुजाता उर्फ बाबई चव्हाण यांचे सत्कार करण्यात आले ,उमेद गटाचे सीआरपी रेणुकाताई लिंबोळे , शैलाताई पाटील, शिला जेटीथोर. रेश्मा ताई कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
साहेबराव घुगे, राजकुमार स्वामी, राजू देवशिंगकर सत्कार करण्यात आले व सूत्रसंचालन रेणुका ताई लिंबोळे यांनी केले व कार्यक्रमांचे प्रास्ताविका राजकुमार गायकवाड यानी केलें व कार्यक्रमाचे आभार सुजाता उर्फ बाबई चव्हाण यांनी केले.