पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के)
हत्याकांडाची उच्च स्तरीय चौकशी करावी ही मागणी करणार असून दोषींना कठोर शिक्षा होईन या साठी प्रयत्न करणार
मा. यशवंतभाऊ नडगम
(राष्ट्रीय अध्यक्ष दलित पँथर )———————————————- भोर येथील बौद्ध युवक का.विक्रम गायकवाड यांचं झालेलं हत्याकांड त्या अनुषंगाने आज भोर येथील त्यांच्या निवास्थानी जाऊन दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम व सहकाऱ्यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व, सत्य घटना ऐकून अंगावर शहारे येत डोळ्यात आपोआप अश्रू अनावर होत होते घडलेल्या सर्व घटनेची माहिती घेतली असता हा खून असून एक व्यक्तीचे काम नसून यात गुन्हेगार संघटित करून जमावाने तसेच सापळा रचुन केलेलं षड्यंत्र आहे हे स्पष्ट समजल या दरम्यान चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले व संपूर्ण आरोपी अटक होई पर्यंत हा लढा पँथर प्रशासनाला जाब विचारत आंदोलना मार्फत लावून धरणार असल्याचे यशवंतभाऊ नडगम यांनी कुटुंबियांना आश्वाशित केले त कुटूंबीयांशी संवाद सादत असताना व पोलिसांनी जी चौकशी (SIT)समिती नेमली आहे त्यात त्यांनी नमूद केल्या प्रकारे एकच उच्चस्पद अधिकारी असून बाकीचे सदस्य हे स्थानिक पोलीस अधिकारी असून त्यांना आमचा विरोध असल्यामुळे ही तपास हा निपक्ष पणे होऊ शकत नसल्याचे सांगितले व चौकशी समितीत DYSP दर्जाचे अधिकारी असावेत व हे अधिकारी पुणे जिल्हाच्या बाहेरील असावेत या तुन निपक्ष चौकशी होईल व बाकीचे ही आरोपी समोर येथील अशी आशा कुटुंबियांनी व्यक्त केली व या मागणी करिता पुन्हा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची सर्वान सोबत भेट घेणार असल्याचे ही सांगितले.
यावेळी दलित पॅंथरचे पदाधिकारी उपस्थित होते.