spot_img
spot_img
spot_img

ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्यावर आली उपासमाराची वेळजुलै महिन्या पासून पगार नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा ?

नंदगाव प्रतिनिधी (शाम नागिले) धाराशिव जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायतींमध्ये 14 वर्षापासून ऑनलाईन कामे करण्यासाठी संगणक परिचालक पदावर 510 संगणक परिचलक कार्यरत आहेत. त्यांना मासिक १० हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र तेही मानधन वेळेवर मिळत नसल्याने परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तुटपुंज्या मानधनावर संगणक परिचालक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न पडला आहे .

या बाबत सविस्तर व्रत असे की ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामकाज करत असताना ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखले देणे, पत्रव्यवहार करणे, प्रस्ताव तयार करणे , आयुष्मान योजना, अग्रोंस्टिक योजना , प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ,बहीण लाडकी योजना , भाऊ लाडका योजना , आदी कामे ग्रामपंचायत येथे अनेक प्रकारची कामे त्यांना करावी लागतात, पण नियमित वेतन न मिळाल्याने घर कसे चालावे हाच एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो आहे मग काम करावे तरी कसे की समस्या त्यांना भेडसावत आहे,. रात्र दिवस जागून कामे करावे लागत आहे . ग्रामपंचायत 15 वावित्त आयोगातून संगणक परिचालक यांचे वार्षिक मानधन प्रति महिना १२ हजार रुपयेप्रमाणे एकदम घेण्यात येते. यापैकी फक्त १० हजार रुपये मानधन प्रत्यक्षात दिले जाते. ते सुद्धा दर महिन्याला मिळत नाही. मानधन महिन्याच्या सुरुवातीला एक तारीख निश्चित करून नियमितपणे मिळावे,असे परिपत्रक असून सुद्धा मानधन वेळेवर दिले जात नाही जर तत्काळ मानधन जमा नाही केल्यास पुढील काळा मध्ये संघटना उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे येईल असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा सचिव विश्वास गुडे यांनी म्हणाले आहे .

Related Articles

ताज्या बातम्या