spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथे जुना रस्ता सुरू करण्यासाठी रविवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन

नळदुर्ग (प्रतिनिधी) – अणदूर ते नळदुर्ग दरम्यानचा जुना रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने रविवार, दिनांक 17 रोजी सकाळी 10 वाजता नळदुर्ग येथील संविधान चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही काळापासून अणदूर–नळदुर्ग जुना रस्ता बंद असल्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्ग लांब व असुविधाजनक असल्याने वेळ व इंधनाचा अतिरिक्त खर्च वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जुना रस्ता सुरू करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आयोजकांनी दिला आहे. या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या