spot_img
spot_img
spot_img

भिमगर्जना तरुण मंडळाची कार्यकारणी जाहीर; 23 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक

आरळी बु. (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिमगर्जना तरुण मंडळ, आरळी बु. यांच्या वतीने नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. माजी जयंती उत्सव अध्यक्ष नेताजी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत सर्वानुमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी राहुल सोनवणे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी राम साबळे, तर खजिनदारपदी विलास सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीसाठी मिरवणूक प्रमुख म्हणून दिगंबर गायकवाड, नेताजी सोनवणे, लखन साबळे, प्रशांत गायकवाड, किरण गायकवाड, गणेश बनसोडे, अमोल गायकवाड, रवि सोनवणे, तेजस सोनवणे, प्रदीप गायकवाड, दयानंद सोनवणे व विजय सोनवणे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दि. 23 एप्रिल 2026 रोजी अणदूर व आरळी बु. परिसरात मोठ्या उत्साहात काढण्यात येणार असून, यासाठी मंडळाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे.

जयंती उत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या