spot_img
spot_img
spot_img

दयानंद शिंदे : काक्रंबा गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक

दयानंद मनोहर शिंदे: गावगड्यातल उदयोन्मुख युवा नेता..

मी दयानंद शिंदे यांना जवळून ओळखले नाही, तरी त्यांचे जीवन, त्यांची संघर्षमय वाटचाल आणि समाजासाठी केलेले कार्य पाहून मी नक्कीच म्हणू शकतो की तुळजापुर तालुक्यात एक नवा युवा नेता उदयास आला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसांना न्याय, संधी आणि विकास मिळेल.

दयानंद मनोहर शिंदे: गावगड्यातल उदयोन्मुख युवा नेता..मी दयानंद शिंदे यांना जवळून ओळखले नाही, तरी त्यांचे जीवन, त्यांची संघर्षमय वाटचाल आणि समाजासाठी केलेले कार्य पाहून मी नक्कीच म्हणू शकतो की तुळजापुर तालुक्यात एक नवा युवा नेता उदयास आला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसांना न्याय, संधी आणि विकास मिळेल. मसला या छोट्याशा गावातील एका साध्या शेतकरी आणि दलित कुटुंबात जन्मलेला दयानंद यांचा बालपण खूपच संघर्षमय होते. आई-वडील शेतात घाम गाळत होते, घरात संसाधनांची कमतरता होती. अशा परिस्थितीत त्याला लहानपणापासूनच जाणीव झाली की जीवन म्हणजे संघर्ष, आणि संघर्षातूनच व्यक्ती घडतो.

शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झाले. आठवी ते दहावीपर्यंत संस्थेत शिक्षण घेताना त्याला रोजच्या साध्या गोष्टींसाठी जास्त मेहनत करावी लागली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमी हिंदू शिक्षण घेताना पुस्तकं, वही, कपडे, जेवण, राहण्याची सोय – हे सर्व स्वतः कमवा व शिका या योजनेतून काम करत जुळवावे लागले. परंतु या संघर्षातच त्याला स्वावलंबन, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव रुजली. गावाबाहेर येऊन शहरात उच्च शिक्षण घेतल्यावर अडचणी अधिक वाढल्या. राहण्यासाठी जागा, जेवण, अभ्यासासाठी साहित्य – सर्व काही स्वतःच्या मेहनतीने जुळवावे लागले. पण या संघर्षाने त्याला समाजाच्या दुःखाची जाणीव अधिक घट्ट दिली.

२०११ ते २०१६ या कालावधीत बजरंग दलात सक्रिय राहून त्याने संघटनात्मक काम, शिस्त, नेतृत्व आणि सामाजिक जाणीव आत्मसात केली. या काळात त्याने लक्षात घेतले की खरा नेता तोच होतो जो लोकांच्या वेदना समजून घेतो, त्यांच्या न्यायासाठी लढतो आणि प्रत्येक निर्णय लोकांच्या हितासाठी घेतो. पुण्यात प्रवेश घेऊन जगातील सर्वात मोठी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मध्ये कार्य करताना तो आंदोलन प्रमुख, राष्ट्रीय कला मंच प्रमुख, विद्यापीठ अध्यक्ष, महानगर सहमंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा जबाबदाऱ्यांवर काम करू लागला. हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न, फीस, हॉस्टेल, भोजन, परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन – यांसारख्या समस्या त्याने प्रत्यक्ष अनुभवल्या आणि त्यासाठी आंदोलन, चर्चा आणि मार्गदर्शन केले.

त्याच्या प्रवासात आमदार रामभाऊ सातपुते, प्रचारक सुनील साठे, आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, सागर (आबा) काळे, हनुमंत रंगा, श्रीराम खंदारे यांसारख्या अनुभवी नेत्यांचे आणि मित्रांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. मित्रपरिवार आणि संघटनातून त्याने शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या वेदना जाणवल्या, त्यांच्या अपेक्षा समजल्या. एखाद्या शेतकऱ्याचा पिकविमा मिळाला नाही किंवा मार्केटिंग करताना अडचण आली, तर त्याच्यासाठी तो उपाय शोधतो; महिलांना आर्थिक सक्षमीकरण हवे असेल, तर प्रशिक्षण कॅम्प राबवतो; युवकांना करिअर मार्गदर्शन हवे असल्यास कार्यशाळा आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देतो; विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, करिअर संधी आणि मार्गदर्शन सुनिश्चित करतो.

कोविड काळात त्याने आपल्या आयुष्याचा सर्वोच्च उपयोग लोकसेवेसाठी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातील पहिलं कोविड सेंटर उभारले यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत पहिला स्वयंसेवक म्हणून धडाडीने समोर आला, एखाद्याला ॲम्बुलन्स उपलब्ध होत नसेल तर विद्यार्थी परिषदेच्या संकल्पनेतून उभा राहिली मोटरसायकल ऍम्ब्युलन्स या उपक्रम अंतर्गत स्वतः मोटरसायकल चालवत पेशंटला हॉस्पिटल आणि कोविड सेंटर मध्ये पोहोचवणे असेल, झोपडपट्टीतील कुटुंबांना अन्नधान्य व औषधं पोहोचवणे, पोलिस आणि प्रशासनाला PPE किट्स पुरवणे – या सर्व कृतींनी त्याच्या सेवाभावी वृत्तीची खरी ओळख निर्माण केली. संकटाच्या काळात तो फक्त निर्णय घेणारा नव्हता, तर लोकांसमोर उभा राहणारा, त्यांचा दुःख जाणणारा, त्याग करणारा विद्यार्थी नेता होता.

२०२२ मध्ये सक्रिय राजकारणाची वाट धरून, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, नंतर भाजप जिल्हा चिटणीस म्हणून कार्यरत राहून, वयाच्या २४–२५ व्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्याने सिद्ध झाले की नेतृत्व वयावर नाही, तर कार्यावर ठरतं. त्याला शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या आत्मसात आहेत. त्याला ठाऊक आहे की शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पिकविमा, मार्केटिंग प्लॅटफॉर्म, डिजिटल साधने, प्रशिक्षण कशी मिळवता येईल; महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी काय आवश्यक आहे; युवकांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, शिष्यवृत्ती कशी मिळवता येईल; विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी आणि मार्गदर्शन कसे उपलब्ध करावे.

दयानंद शिंदे सारख तरुण नेतृत्व जर जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला तर गावा-गाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तो उचलून फोडेल. महिलांचे सक्षमीकरण साधेल; युवकांना करिअर आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देईल; विद्यार्थी आणि शिक्षणासाठी झगडणाऱ्यांना शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन मिळेल. प्रत्येक निर्णय पारदर्शक, प्रत्येक कृती लोकांच्या हितासाठी असेल. त्याच्या नेतृत्वाखाली आपल्या गटातला जिल्हा परिषद गट असेल किंवा तालुक्याचा विकास, समाजाची उन्नती आणि प्रत्येक घटकाची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

लोक म्हणतात, “तो फक्त नेता नाही, तो आमचा आहे. एखाद्या मुलाचे दुःख दिसलं की, लगेच त्याच्या मागे उभा राहतो. त्याच्या कृतीत समाजासाठी ध्येय स्पष्ट दिसतं, त्याच्या शब्दांत प्रेम आणि प्रामाणिकपणा आहे. असा युवा नेता आपल्या तालुक्यात नक्कीच हवा होता.”

दयानंद शिंदे यांचे जीवन हे संघर्षातून घडलेले नेतृत्व, समाजसेवेची निष्ठा आणि आदर्श नेता कसा असावा याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्याची प्रत्येक कृती, प्रत्येक योजना, प्रत्येक निर्णय हे दाखवतात की नेता फक्त पदावर नाही, तर समाजाची सेवा करण्याच्या दृढ निश्चयाने उभा असतो. लहानपणापासून ते आजपर्यंतचा त्याचा प्रवास हे दाखवते की लोकांच्या वेदना समजून घेणारा, त्याग करणारा, लोकांसाठी कार्य करणारा, दूरदृष्टी असलेला, प्रामाणिक आणि संवेदनशील नेता तुळजापूर तालुक्यातील गाव-गाड्या उदयास आला आहे.

आज आपण या युवा नेतृत्वाच्या मागे उभे राहिलो, तर आपल्या जिल्हा परिषद गटात विकास, शेतकऱ्यांचा प्रगती मार्ग, महिलांचे सक्षमीकरण, युवकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी संधी यांची खात्री करता येईल. दयानंद मनोहर शिंदे हे फक्त आजच नव्हे, तर भविष्यातील उज्ज्वल नेतृत्व आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या